Thursday, August 20, 2026
Latest:
राजकीय

भाजप कल्याण जिल्ह्याची संघटनात्मक बांधणी मजबूत; ६ प्रभागांसाठी ‘प्रभाग प्रभारी’ जाहीर

कल्याण / डोंबिवली:

भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्या वतीने आगामी निवडणुकांच्या आणि संघटनात्मक मजबुतीकरणाच्या दृष्टीने प्रभागांची जबाबदारी निश्चित करण्यास सुरुवात झाली आहे. भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर (नंदू) परब यांच्या नेतृत्वाखाली प्रभागांनुसार ‘प्रभाग प्रभारी’ यांच्या नियुक्त्यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे.

भाजप कल्याण जिल्हा कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या या यादीत अनुभवी, अभ्यासू आणि पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे दिसून येत आहे.

मिहीर देसाई आणि मनोज घरत यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी

या नियुक्त्यांमध्ये प्रभाग क्रमांक २६ चे प्रभारी म्हणून मिहीर देसाई यांची निवड करण्यात आली आहे. मिहीर देसाई हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) स्वयंसेवक असून त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये (ABVP) पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्य केले आहे. याशिवाय त्यांनी कल्याण जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षपद यशस्वीरीत्या सांभाळले असून, सध्या ते महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाच्या सचिवपदी कार्यरत आहेत. त्यांच्या प्रदीर्घ संघटनात्मक अनुभवाचा फायदा या प्रभागात भाजपला मिळणार आहे.

तसेच, प्रभाग क्रमांक २७ ची जबाबदारी श्री. मनोज घरत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मागील कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) डोंबिवली शहराध्यक्षपद सोडून मनोज घरत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्षप्रवेशानंतर त्यांच्या कार्याची दखल घेत भाजपने आता त्यांच्यावर प्रभाग प्रभारी म्हणून ही नवीन आणि महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.

KDMC: अनधिकृत बांधकामाची तक्रार करूनही ८ वर्षे कारवाई नाही, त्रस्त नागरिकांचे ९ आणि १५ ऑगस्ट रोजी आंदोलन केडीएमसीच्या कारभाराचा नमुनाच समोर

नियुक्त करण्यात आलेले प्रभाग आणि प्रभारी यांची संपूर्ण यादी:

प्रभाग क्र. २६ (म्हात्रे नगर, राजाजी पथ, रामनगर, शिवमार्केट, स्वा. सावरकर रोड) प्रभाग प्रभारी: श्री. मिहीर देसाई 

प्रभाग क्र. २७ (पाथर्ली गावठाण, टिळकनगर, अंबिकानगर, गोगरासवाडी) प्रभाग प्रभारी: श्री. मनोज घरत 

प्रभाग क्र. २८ (दत्तनगर, संगीतावाडी, एकता नगर, आनंदनगर, गांधी नगर) प्रभाग प्रभारी: श्री. ओमनाथ नाटेकर 

प्रभाग क्र. २९ (आयरेगाव, तुकाराम नगर, सुनिलनगर, नांदिवली तर्फे पंचानंद) प्रभाग प्रभारी: श्री. विजय जुगदर / श्री. मिलिंद म्हात्रे 

प्रभाग क्र. ३० (भोपर संदप, नांदिवली गाव – मिलन पार्क, घारीवली, काटई, उसरघर) प्रभाग प्रभारी: श्री. गोपीचंद पाटील 

प्रभाग क्र. ३१ (गोळवली, उंबार्ली – भाल – दावडी, माणगाव, सोनारपाडा, हेदुटणे – कोळे, घेसर – निळजे) प्रभाग प्रभारी: श्री. सुखदेव पाटील

डोंबिवलीत ६५ वर्षांवरील ज्येष्ठ पुरुषांसाठी ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड शिबिराचा शुभारंभ

या नियुक्त्यांमुळे संबंधित प्रभागांमध्ये भाजपचे संघटन अधिक मजबूत होईल आणि स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे सर्व प्रभारी मध्यवर्ती भूमिका बजावतील, असा विश्वास पक्षाच्या नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात आला आहे.