सामाजिक

डोंबिवली: कोपरगाव तलाव स्वच्छतेसाठी ‘निर्मल’ पुढाकार; ३ मे रोजी स्वच्छता मोहीम

डोंबिवली: शहराला स्वच्छ आणि हरित बनवण्याच्या उद्देशाने निर्मल यूथ फाऊंडेशन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका (क.डो.म.पा.) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोपरगाव तलाव स्वच्छता मोहीम-२०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही मोहीम येत्या ३ मे २०२६ रोजी राबवली जाणार आहे.

पर्यावरणाचे रक्षण आणि तलावांच्या संवर्धनासाठी नागरिकांनी एकत्र यावे, या भावनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. “आपले आरोग्य आणि तलावाचे रक्षण करण्यासाठी एकत्र येऊया” असे आवाहन फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवलीत १११ वृक्षांची लागवड; निर्मल युथ फाउंडेशनच्या उपक्रमाचे शहरभर कौतुक

मोहीमेचा तपशील:

दिनांक: रविवार, ३ मे २०२६

वेळ: सकाळी ८:०० ते १०:००

ठिकाण: कोपर तलाव, म्हाळसा मंदिराजवळ, डोंबिवली (पश्चिम)

या मोहिमेसाठी घनकचरा विभागाचे (क.डो.म.पा.) माननीय उपायुक्त श्री. रामदास कोकरे साहेब मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिक तलाव परिसरातील कचरा हटवून परिसर चकाचक करणार आहेत.

निर्मल युथ फाउंडेशनतर्फे गणेश विसर्जन घाटावर निर्माल्य संकलन; १७ हजार किलो निर्माल्य जमा

मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिकांना पोस्टरवरील QR कोड स्कॅन करून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी +९१ ९१३७१८७०८५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. “एकत्र मिळून आपण एक स्वच्छ आणि हरित जग निर्माण करू शकतो,” असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.