Thursday, June 25, 2026
Latest:
सामाजिक

भारतीय मजदूर संघ, ठाणे जिल्हा — 70 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य सोहळा

श्रमिक हक्क आणि न्यायासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या भारतीय मजदूर संघ या देशातील प्रमुख कामगार संघटनेच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे जिल्हा स्तरावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ही गौरवशाली परंपरा पुढे नेत, संघटनेच्या स्थापनेचा हा ऐतिहासिक टप्पा बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत साजरा केला जाणार आहे. कार्यक्रमाचे ठिकाण आहे जिल्हा कार्यालय, केळकर रोड, रामनगर, डोंबिवली (पूर्व).

जिल्हाध्यक्ष श्री. सचिन कदम, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. भरत गोडसे, जिल्हा सचिव श्री. विलास आचरेकर, जिल्हा कोषाध्यक्ष श्री. दीपक गांगोडे, जिल्हा संघटन मंत्री श्री. उमेश भोसले आणि ठाणे जिल्ह्यातील अन्य कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

कार्यक्रमात भारतीय मजदूर संघाच्या कार्याची झलक, श्रमिक हिताचे मुद्दे आणि संघटनेच्या पुढील वाटचालीसंदर्भातील विचारमंथन होणार आहे. सर्व कामगार बांधवांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या कार्यक्रमात सप्रेम आमंत्रण देण्यात आले आहे.

या कार्यक्रमानंतर २६ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता डोंबिवलीच्या टिळकपुतळ्यापासून कॅप्टन सच्चान स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

‘श्रम हीच आराधना’ या तत्त्वाला अनुसरून कार्य करणाऱ्या संघटनेचा हा उत्सव ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे.’

sources – Sachin Shinde