भिवंडी निजामपूर महापालिकेचा विकास प्रारूप आराखडा प्रसिद्ध; नागरिकांकडून हरकती, सूचना मागविल्या
भिवंडी दि.१३ – वाढते नागरिकरण लक्षात घेऊन भिवंडी निजामपूर महापालिका प्रशासनाने शहराचा नवीन विकास प्रारूप आराखडा तयार करून प्रसिद्ध केला आहे. महापालिका प्रशासनाने नागरिकांकडून ३० दिवसांत हरकती व सूचना मागविल्या आहेत. आराखड्यामध्ये शहरातील विविध भुखंडावर आरक्षणे टाकण्यात आली असून उद्यान, मैदान, रस्ते तसेच इतर नागरी सुविधांचा समावेश आहे. हा आराखडा मंजूर करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत १ हजार ५४१ जलमापकांची चोरी
भिवंडी निजामपूर महापालिकेचा प्रारूप विकास आराखडा २००१ आणि २००३ मध्ये तयार करण्यात आला होता. यात पुढील २० वर्षांचे नियोजन करण्यात आले होते. आता २०४३ पर्यंतचा विचार करून विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात काशिगाव या नव्या पोलीस ठाण्याची निर्मिती
भविष्यात शहरात कोणत्या नागरी सुविधा उभारणे गरजेचे आहे आणि त्या कोणत्या ठिकाणी असाव्यात याचे नियोजन आराखड्यात करण्यात आले. राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार आराखडा तयार करण्यात आला आहे.
