ठळक बातम्या

लोअर परळच्या उड्डाणपुलावर पदपथ बांधण्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांचे आदेश

मुंबई दि.१२ – लोअर परळच्या पुलावर पदपथ नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून या पुलाच्या कडेला पदपथाची निर्मिती करावी, असे आदेश पालकमंत्री दिपक केसरकर यांनी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाला दिले. लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळ ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावर हा पूल बांधण्यात येत आहे.

भिवंडी निजामपूर महापालिकेचा विकास प्रारूप आराखडा प्रसिद्ध; नागरिकांकडून हरकती, सूचना मागविल्या

करी रोडच्या बाजूचे आता थोडेच काम शिल्लक आहे. या पुलावर पादचाऱ्यांसाठी पदपथ नसल्यामुळे लोअर परळ स्थानकातून करी रोड स्थानकापर्यंत पायी जाणाऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे पदपथाची मागणी पादचारी आणि प्रवासी यांच्याकडून करण्यात येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत १ हजार ५४१ जलमापकांची चोरी

लोअर परेल परिसरात अनेक लहान मोठी कार्यालये असून नोकरदारांची मोठ्या प्रमाणात जा ये सुरू असते.‌ लोअर परळ स्थानकाबाहेरील चिंचोळ्या गल्लीत सकाळ संध्याकाळ खूप गर्दी होत असल्याने उड्डाणपुलावर पदपथाची गरज असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *