ठळक बातम्या

हिंदूंच्या धार्मिक कृत्यांवर गदा आणणारा जादूटोणाविरोधी कायदा रद्द करा – हिंदू जनजागृती समितीची मागणी

मुंबई दि.२९ :- हिंदूंच्या धार्मिक कृत्यांवर गदा आणणारा आणि श्रद्धेवर आघात करणारा हा काळा कायदाच रद्द करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली आहे.‌ जादूटोणाविरोधी कायदा हा हिंदू धर्माच्या विरोधातच आहे. हा कायदा केवळ फसवणूक, आर्थिक लुबाडणूक वा अत्याचाराच्या विरोधात आहे; तर समृद्धी महामार्गावरील अपघात थांबावेत, जनतेचा जीव वाचावा, या सद्हेतुने स्वत:च्या खर्चाने कोणी प्रार्थना, पूजा, मंत्रजप करत असेल, तर त्यात गैर काय आहे ? यात कोणता अपराध आहे ? यातून कायदा-सुव्यवस्थेला कुठे बाधा निर्माण झाली ? असे प्रश्न घनवट यांनी उपस्थित केले आहेत.

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक

हिंदू धर्मावर आघात करण्यासाठी हा कायदा एक हत्यार म्हणून वापरला जात आहे. एड्स, कॅन्सर यांसारखे अनेक असाध्य रोग बरा करण्याचा दावा करून जनतेची खर्‍या अर्थाने फसवणूक करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या कार्यक्रमावर गुन्हा दाखल करण्यासाठी अंनिसवाल्यांनी कधीही पुढाकार घेतला नाही; मात्र येथे महामृत्यूंजय जप केल्यावर गुन्हा दाखल केला, यातूनच त्यांचा हिंदू धर्मविरोधी चेहरा दिसून येतो, असे घनवट यांनी सांगितले.‌ स्वत: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दरवर्षी आषाढी अन् कार्तिकी वारीला श्री पांडुरंगाच्या चरणी ‘बळीराजा सुखी होऊ दे, चांगले पीक येऊन, दुष्काळ वा नैसर्गिक आपत्ती दूर होऊ दे’ म्हणून पूजा करतात. मग त्या पूजेवरही अंनिसवाले गुन्हा दाखल करणार का ? अनेक मंत्री निवासस्थानी वा त्यांच्या कार्यालयात ‘शुभ कार्य व्हावे, अडथळे दूर व्हावेत’ म्हणून श्रीसत्यनारायण पूजा करतात. त्यांच्यावरही अंनिसवाले गुन्हा करणार का ? असेही घनवट यांनी म्हटले आहे.

जे लोक आपला पक्ष सोडून गेले त्यांचे आणि आपले संबंध तुटले – उद्धव ठाकरे

समृद्धी महामार्गावर अपघात होऊ नयेत, यासाठी दिंडोरी (नाशिक) येथील श्री स्वामी समर्थ संप्रदायाच्या वतीने सव्वा कोटी महामृत्यूंजय मंत्रजप करण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोळकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार ‘जादूटोणा विरोधी कायद्या’च्या आधारे बुलढाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सद्हेतूने समाजहितासाठी केलेल्या धार्मिक कृतीला गुन्हा ठरवणे, हा सरळसरळ जादूटोणा कायद्याचा दुरूपयोग आहे. हा कायदा अंधश्रद्धांचे नव्हे, तर हिंदूंच्या धर्मश्रद्धांचे निर्मूलन करणारा आहे, असे घनवट यांचे म्हणणे आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *