महिला स्वयंसहाय्यता गटांना दुपटीने अर्थसहाय ६० लाखांहून अधिक महिलांना लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.२८ :- उमेद अभियानातील महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून ३० हजार रुपये निधी प्रत्येक गटांना देण्यात येईल. तसेच कर्मचारी आणि चळवळीतील संसाधन व्यक्तींच्या मानधनातही भरीव वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.
कुलकर्णी परिवारातर्फे ‘मल्हार रंग‘ कार्यक्रमात कौस्तुव गांगुली यांचे गायन
विधिमंडळात निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता गटांना प्रती गट १५ हजार रुपये फ़िरता निधी देण्यात येतो. त्यामध्ये वाढ करुन प्रती समुह ३० हजार रुपये देण्यात येईल. स्वयंसहाय्यता गटांना दैनंदिन मार्गदर्शन करण्यासाठी गावपातळीवर एकूण ४६ हजार ९५६ समुदाय संसाधन व्यक्ती कार्यरत आहेत.
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन ४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
त्यांना दरमहा ३ हजार रुपये एवढे मानधन देण्यात येते. त्यांच्या मानधनात वाढ करून ते पदरमहा ६ हजार रुपये एवढे करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. उमेद अभियानांतर्गत आतापर्यत सुमारे ६ लाख स्वयंसहाय्यता समूह स्थापन करण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
