कुलकर्णी परिवारातर्फे ‘मल्हार रंग‘ कार्यक्रमात कौस्तुव गांगुली यांचे गायन
डोंबिवली दि.२८ :- कुलकर्णी परिवारातर्फे येत्या ५ ॲागस्ट रोजी ‘मल्हार रंग‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पं. अजय चक्रवर्ती यांचे शिष्य कौस्तुव गांगुली यांचे गायन होणार आहे. गांगुली यांना स्वप्नील भिसे (तबला), सिध्देश बिचोलकर (संवादिनी) हे संगीतसाथ करणार आहेत.
Dombivli : टिळकनगर बाल विद्यामंदीरात ‘विना दप्तरा’ ची शाळा रंगली!
हा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता,सुयोग सभागृह, लोकमान्य टिळक रस्ता,डोंबिवली (पूर्व) येथे होणार असून सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे. रसिकांनी या मैफलीला उपस्थित राहावे, असे आवाहन कुलकर्णी परिवाराकडून करण्यात आले आहे.
