गुन्हे-वृत

कंगना राणावतला धमकाविल्याप्रकरणी जावेद अख्तर विरोधात फौजदारी कारवाई

५ ऑगस्ट रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश

मुंबई दि.२५ :- अभिनेत्री कंगना राणावतला धमकाविणे, अपमान करणेप्रकरणी महानगरदंडाधिका-यांनी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात फौजदारी कारवाई सुरू केली आहे. न्यायालयाने अख्तर यांना येत्या ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

मोठे उद्योग राज्याबाहेर जाण्याबाबत अधिवेशनात श्वेतपत्रिका सादर होणार

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना कंगनाने अख्तर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यानंतर अख्तर यांनी कंगनाविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त कृतज्ञता सन्मान सोहळा

कंगनानेही अख्तर यांच्याविरोधात धमकाविणे आणि अपमान केल्याची तक्रार नोंदविली. कंगनाने केलेल्या या तक्रारीप्रकरणी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी अख्तर यांच्याविरोधात सोमवारी फौजदारी कारवाई सुरू केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *