ठळक बातम्या

कृषी योजनांचा निधी पूर्णपणे खर्च होण्याच्या दृष्टीने नियोजन करा – राज्यपाल रमेश बैस

मुंबई दि.२२ :- कृषी योजनांचा राज्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ व्हावा या दृष्टीने अर्थसंकल्पीय निधी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी पूर्णपणे खर्चित होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी काल येथे केली. राजभवन येथे झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील कृषी विभागाच्या विविध केंद्र – पुरस्कृत व राज्य योजनांचा राज्यपाल बैस यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र भूषण सोहळ्यानंतर चेंगराचेंगरी झाल्याचा आरोप पूर्णतः तथ्यहीन – सुधीर मुनगंटीवार

कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार यांनी २०२३ – २४ या वर्षाकरिता कृषी क्षेत्रातील शासनाच्या उद्दिष्टांची तसेच २०२३ -२४ वर्षाकरिता अर्थसंकल्पीय तरतुदी व नव्या उपक्रमांची माहिती दिली. राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह, ‘स्मार्ट प्रकल्प’ संचालक कौस्तुभ दिवेगावकर, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यावेळी सादरीकरण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *