रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने बदलापूर ते अंबरनाथ वाहतूक ठप्प
बदलापूर, दि. १९
बुधवारी सकाळपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे बदलापूर ते अंबरनाथ दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने सकाळी अकराच्या सुमारास अप-डाउन मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
मंगळवारी रात्रीपासून कोसळणा-या जोरदार पावसामुळे बदलापूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
सर्व शासकीय यंत्रणा सतर्क- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हेंद्रपाडा, मांजर्ली, वालीवली, सोनिवली परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
——
