ठळक बातम्या

सर्व शासकीय यंत्रणा सतर्क- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १९
मुंबई, ठाण्यासह रायगड, रत्नागिरी आणि महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला, होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

खताच्या किमती मर्यादित राहण्यासाठी केंद्र सरकारकडून १ लाख ३० हजार कोटी रुपयांचे अनुदान- अजित पवार

आज सकाळपासूनच आपण राज्याचे मुख्य सचिव, सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्या सतत संपर्कात असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करणे, त्यांना सुरक्षितस्थळी हलविणे, त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

म्हाडा मुंबई मंडळ घरांसाठीची अर्ज प्रक्रिया पूर्ण; पात्र आणि अपात्र अर्जदारांची यादी जाहीर

राज्यात आवश्यक त्या ठिकाणी एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून बृहन्मुंबई महापालिकेसह इतर महापालिका, नगरपालिका, जिल्हा प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणा, व्यवस्थापन सज्ज असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *