मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार; जनजीवन विस्कळित,
मध्य रेल्वेच्या वाहतुकीला फटका, प्रवाशांचे हाल
– येत्या २४ तासात मुंबई, ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
– मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई गाड्या उद्यापर्यंत रद्द
– ठाणे, डोंबिवली, कल्याण येथील सखल भाग पाण्याखाली
मुंबई, दि. १९
गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने ठाणे, डोंबिवली, कल्याण आदी रेल्वे स्थानकात प्रचंड प्रमाणात गर्दी झाली. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या काही महत्त्वाच्या स्थानकांवरून एसटी बसगाड्या सोडण्याची सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.
रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने बदलापूर ते अंबरनाथ वाहतूक ठप्प
मुंबई ते पुणे दरम्यान धावणा-या इंद्रायणी, सिंहगड आदी गाड्या उद्यापर्यंत ( गुरुवार) रद्द करण्यात आल्या आहेत, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
सर्व शासकीय यंत्रणा सतर्क- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कल्याण डोंबिवली परिसरात बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस झाला. कल्याण ते डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी दुपारी तांत्रिक बिघाड झाला. यामुळे काही काळ मध्य रेल्वेची लोकल वाहतूक डोंबिवलीपर्यंतच सुरू होती. कल्याण ते कसारा वाहतूक बंद होती. तसेच अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने ही वाहतूकही ठप्प झाली होती.
खताच्या किमती मर्यादित राहण्यासाठी केंद्र सरकारकडून १ लाख ३० हजार कोटी रुपयांचे अनुदान- अजित पवार
मुंबई आणि उपनगरातही काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत होता. बुधवारी सकाळीही पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे सकाळी ऐन कार्यालयीन वेळेत लोकल गाड्यांची वाहतूक उशिराने सुरू होती. दुपारनंतरही पावसाचा जोर कायम राहिल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला फटका बसला.
सोमय्या यांच्या कथित वादग्रस्त चित्रफीतीबाबत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरू
रेल्वे मार्गावरुन चालतांना चार महिन्यांचे तान्हे बाळ नाल्यात पडल्याची दुर्दैवी घटना आज कल्याण ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. पाऊस आणि तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे मार्गावर गाड्या एकामागोमाग एक खोळंबल्या होत्या. त्यामुळे बाळाची आई बाळाला घेऊन रेल्वेमार्गावरून चालताना ही दुर्दैवी घटना घडली. बाळाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
कॉन्व्हेंट शाळांऐवजी चांगल्या संस्काराचे शिक्षण देणारी विद्यालये निवडा- गौरी द्विवेदी
विरार जवळील राजवली परिसरात अडकलेल्या नागरिकांची एनडीआरएफच्या पथकाने सुखरूप सुटका केली.
मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या- गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. विधिमंडळाचे कामकाज संपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी बृहन्मुंबई महापालिका आपत्कालीन नियंत्रण कक्षास भेट दिली आणि मुंबई व उपनगरातील पाऊस, महापालिका प्रशासनाच्या कामाचा आढावा घेतला.
—-
