विज्ञानाधिष्ठीत सांस्कृतिक वारसा शिक्षणातून जपावा – विवेक भागवत यांचे प्रतिपादन
डोंबिवली, दि. १९
विज्ञानाधिष्ठीत सांस्कृतिक वारसा शिक्षणातून जपला गेला पाहिजे असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे कोकण प्रांत सेवा विभाग प्रमुख विवेक भागवत यांनी येथे केले.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे इंग्रजी भाषेच्या गुलामगिरीतून मुक्तता – दीपक केसरकर
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या टिळकनगर कॉलेज ऑफ कॉमर्सच्या बीएमएस व बीएएफ या शैक्षणिक वर्गाच्या उदघाटन प्रसंगी भागवत बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. संदीप घरत होते.
महापालिकेतर्फे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आणखी तीन सीबीएसई शाळा सुरू
महाविद्यालयीन शिक्षणातून अर्थाजन, रोजगार निर्माण करण्याचे ध्येय ठेवतानाच समाजव्यवस्था असंतुलित न राहाता भविष्यातील संकटांना सामोरे जाण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी मिळवावी असे आवाहनही भागवत यांनी केले.
Dombivli: वृक्ष लागवड आणि संवर्धनचा दुसरा टप्पा पूर्ण
संस्थेचे कार्यवाह आशीर्वाद बोंद्रे यांनी प्रास्ताविक केले तर महाविद्यालयाचे प्राचार्य के.वि.फडके यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेबाबत व पुढील उद्दिष्टांबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. निलिमा कोडोलीकर यांनी केले तर प्रा.चेतना आसरकर यांनी आभार मानले.
———–
