नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे इंग्रजी भाषेच्या गुलामगिरीतून मुक्तता – दीपक केसरकर
मुंबई दि.२६ :- इंग्रजी भाषेच्या गुलामगिरीतून आपण आजही मुक्त झालेलो नसून भाषिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचे काम नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून करण्यात येईल, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी येथे केले. शाळा पूर्वतयारी अभियानातील ‘पहिले पाऊल’ या उपक्रमाचा भाग म्हणून राज्यातील प्रातिनिधिक स्वरूपातील पहिला मेळावा मुंबईत वरळी सी फेस महापालिका शाळा संकुल येथे आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनात शाहीर साबळे यांचे स्थान अढळ- शरद पवार
प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि बृहन्मुंबई महापालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केसरकर बोलत होते. शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत पहिले पाऊल हा उपक्रम राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, सामाजिक न्याय विभाग आदी ६५ हजारांहून अधिक शाळांमध्ये १५ लाख मुलांच्या पूर्वतयारीसाठी राबविण्यात येणार आहे.
पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्याला यलो ॲलर्ट जारी
विद्यार्थ्यांना विविध उपक्रम, खेळ, कृती, भावनिक विकास, शिस्त, कलांची ओळख कशी करून द्यावी, बालकांची क्षमता तपासून त्यांची शाळा पूर्वतयारी कशी करून घ्यावी याचे प्रात्यक्षिक दिले जाणार आहे. अभिनेते सचिन खेडेकर, अभिनेत्री निशिगंधा वाड, शिक्षण विभागाचे सचिव, आयुक्त, संचालक, महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका आणि इयत्ता पहिलीत दाखल होणारी मुले व त्यांचे पालक यावेळी उपस्थित होते.