ठळक बातम्या

नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई, दि. १३
गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला.

न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठाने मलिक यांच्या याचिकेवर निर्णय देताना त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास नकार दिला.

मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असले तरी मूत्रपिंडाच्या उपचारांसाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून कुर्ला येथील खासगी रुग्णालयात दाखल आहेत. वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास विशेष न्यायालयाने नकार दिल्यानंतर मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मलिक यांच्यातर्फे सादर केलेला अहवाल वैद्यकीय जामिनासाठी पुरेसा नसल्याचा दावाही ईडीने केला होता. शिवाय, आपल्या या दाव्याच्या समर्थनार्थ जेजे रुग्णालयातील तज्ज्ञांचा अहवाल न्यायालयात सादर केला.

मलिक यांच्यावर त्यांनीच सुचविलेल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांना वैद्यकीय जामीन मंजूर करण्याची आवश्यकता नाही, असा दावाही ईडीतर्फे करण्यात आला होता.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *