सेंट जाॅर्जेस रुग्णालयात लवकरच तीन नवे विभाग
मुंबई, दि. १३
सेंट जाॅर्जेस रुग्णालयात सुघटनशल्यशास्त्र, मूत्रविज्ञानशास्त्र, नेत्रशल्यशास्त्र तीन विभाग सुरू करण्यात येणार आहेत.
सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये स्त्री रोग आणि बालरोग विभागाचा फक्त बाह्यरुग्ण विभाग कार्यरत होते. मात्र आता अद्ययावत शस्त्रक्रियागृह सुरू झाल्यानंतर या विभागाचा आंतररुग्ण विभागही सुरू करण्यात येणार आहे.
—-
