ठळक बातम्या

महापालिकेतर्फे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आणखी तीन सीबीएसई शाळा सुरू

मुंबई, दि. ११
बृहन्मुंबई महापालिकेने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आणखी तीन सीबीएसई शाळा मुंबईत सुरू केल्या आहेत. मुंबई पब्लिक स्कूल, आणिक गाव, जिजामाता नगर, चेंबूर पश्चिम, मुंबई पब्लिक स्कूल, एम. जी क्रॉस रोड, साईनगर, कांदिवली पश्चिम आणि मुंबई पब्लिक स्कूल, आशिष तलाव, वडवली, आरसीएफ, चेंबूर येथे या शाळा आहेत.

महापालिकेने २०२० मध्ये जोगेश्वरी पूर्व येथील पूनमनगरमधील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये पहिली सीबीएसईची शाळा सुरू केली होती. शाळेला मिळालेला प्रतिसाद पाहून महापालिकेने आर्थिकदृट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून मुंबई अन्य ठिकाणी सीबीएसईच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

२०२१ मध्ये महापालिकेने आणखी दहा ठिकाणी सीबीएसई तसेच आयसीएसई, आयबी आणि केंब्रीज आयजीसीएसई या बोर्डांची प्रत्येकी एक शाळा सुरू केली. गेल्यावर्षी महापालिकेने सीबीएसई शाळेतील छोटा शिशू व बालवाडी वर्गाची एकेक तुकडी वाढविली होती.
मुंबईत आणखी सीबीएसई शाळा सुरू करण्याचा महापालिका शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *