Wednesday, July 1, 2026
Latest:
ठळक बातम्या

तुंगारेश्वर अभयारण्यातील जल बोगद्याचे काम पूर्ण – मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाची माहिती

मुंबई, दि. १०
तुंगारेश्वर अभयारण्यातील जल बोगद्याचे महत्त्वाकांक्षी काम मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने पूर्ण झाले आहे. सूर्या प्रादेशिक जलपुरवठा योजनेतील हा बोगदा असून त्यातील पाण्याचा लाभ मिरा-भाईंदर व वसई-विरार महापालिका क्षेत्राला होणार आहे.

एसएनडीटी विद्यापीठाने विद्यार्थिनींमध्ये उद्यमशीलता रुजवावी- राज्यपाल रमेश बैस

प्रकल्पांतर्गत विक्रमगड तालुक्यातील सूर्या धरणामधील पाणी धरणाच्या खालील बाजूस असलेल्या कवडास उदंचन केंद्रामार्फत वेती गावाजवळील सूर्या जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाणार आहे. तिथे पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर हे पाणी भूमिगत जलवाहिनीद्वारे गुरूत्वाकर्षण पद्धतीने आधी वसई-विरार आणि नंतर मिरा-भाईंदर महापालिकेच्या वितरण केंद्रात आणले जाणार आहे.

किनारी रस्ता प्रकल्पात जैवविविधता टिकवण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेतर्फे ‘कृत्रिम खडका’चा प्रयोग

ही भूमिगत जलवाहिनी तुंगारेश्वर अभयारण्यातून जाणार असल्याने वन्यजीवांना धोका निर्माण होऊ नये यासाठी तेथे विशेष बोगदा खणण्यात आला आहे.अभयारण्याखालील या ४.४ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम आता पूर्ण झाल्याची घोषणा एमएमआरडीएने केली आहे.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *