किनारी रस्ता प्रकल्पात जैवविविधता टिकवण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेतर्फे ‘कृत्रिम खडका’चा प्रयोग
मुंबई, दि. ७
मुंबई किनारी रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्पात जैवविविधता टिकवण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने ‘कृत्रिम खडका’चा (आर्टिफिशियल रीफ) प्रयोग सुरू केला आहे.
सागरी किनारा मार्गावर एक वर्ष हा प्रयोग केला जाणार आहे. त्याचा अभ्यास करून सागरी जिवांसाठी ते उपयोगी ठरल्यास कृत्रिम खडकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
यामुळे सागरी जीवांना समुद्र किनाऱ्यावर निवासस्थान उपलब्ध होणार असून, त्यांची वाढ किंवा पैदास होण्यास मदत मिळणार आहे.
महापालिकेने हे काम मॅन्ग्रो फाऊंडेशनकडे सोपविले आहे. मॅन्ग्रो फाऊंडेशन आणि एनआयओ (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशिएनोग्राफी)यांच्या संयुक्ताने सागरी किनारा मार्गावरील समुद्री भिंतीलगत असलेल्या खडकांजवळच प्रायोगिक तत्त्वावर नुकतेच कृत्रिम खडक बसविण्यात आले.
—–