Wednesday, July 1, 2026
Latest:
मनोरंजन

‘सन मराठी’वर १७ जुलैपासून ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिका

मुंबई, दि. १९

सन मराठी’ वाहिनीवर येत्या १७ जुलैपासून ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. अभिनेता ‘उमाकांत पाटील वेतोबाची भूमिका साकारणार आहे.

मराठी मनोरंजन क्षेत्रासाठी ‘फिल्मबाजार’ पोर्टल तयार करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आरवली गावाचे ग्रामदैवत म्हणजे ‘श्री देव वेतोबा’. वेतोबा’ हे दैवत भक्तांचे रक्षणकर्त आहे.‌ कोकणच्या क्षेत्रात हातात काठी घेऊन भव्य रूपातील वेतोबा गावांच्या वेशींवर गस्त घालतो. कुणी भक्त संकटात असेल तर त्याचे रक्षण करतो, अशी श्रद्धा आहे.

कला, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रात डोंबिवलीचा ठसा उमटतोय हे गौरवास्पद – कुशल बद्रिके

कोणतेही मोठे काम सुरु करण्यापूर्वी, मोठा निर्णय घेण्यापूर्वी वेतोबाचा कौल घेण्याची प्रथा कोकणात आहे. या वेतोबाची ‘क्षेत्रपाल’ अशी ओळखही कोकणात आहे.

मराठी भाषा विभागाचे ‘मराठी तितुका मेळवावा’ संमेलन – ४ ते ६ जानेवारी दरम्यान आयोजन

‘सोमिल क्रिएशन’ प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत, सुनील भोसले निर्मित ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिकेचे दिग्दर्शन नितिन काटकर यांनी केले असून निलेश मयेकर निर्मिती संकल्पक या भूमिकेत आहेत.

मुंबई आसपास मनोरंजन संक्षिप्त

येत्या १७ जुलैपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता सन मराठी वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *