मनसेकडून युतीचा कोणताही प्रस्ताव उबाठा गटाला देण्यात आलेला नाही- संदीप देशपांडे
मुंबई, दि. ६
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उबाठा गट युतीचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडून देण्यात आलेला नाही, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
पराभव दिसू लागल्याने भाजपकडून दडपशाहीने पक्ष फोडण्याचे काम- नाना पटोल
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे निकटचे सहकारी अभिजीत पानसे हे आज उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी ‘सामना दैनिकाच्या’च्या कार्यालयात गेले होते. मनसे आणि उबाठा गटाच्या युतीचा प्रस्ताव घेऊन ते राऊतांना भेटले अशी चर्चा सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर देशपांडे बोलत होते.
राजीनामा परत घ्यायचाच होता तर दिला कशाला? -अजित पवार यांचा शरद पवार यांना बोचरा सवाल
याआधी आम्ही २०१४ आणि २०१७ मध्ये उबाठा सेनेला युतीचा प्रस्ताव दिला होता. परंतु तेव्हा उबाठा गटाचा अत्यंत नकारात्मक प्रतिसाद होता. त्यामुळे आत्ता आम्ही प्रस्ताव देण्याचा विषय येत नाही, असेही देशपांडे म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात उबाठा गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका
दोन्ही पक्षांची युती व्हावी यासाठी आमच्याकडून दोन वेळा प्रयत्न झाला आहे. परंतु त्यांच्याकडून असा कोणताही प्रयत्न झाला नाही, ही गोष्ट नमूद करणं गरजेचं आहे. तुम्ही कधी त्या भावाला (उद्धव ठाकरे) विचारले आहे का? सगळे प्रश्न मनसेलाच का विचारता? कधी त्यांनाही विचारा. आम्ही प्रस्ताव दिला तेव्हा त्यांनी तो का नाकारला? हे ही त्यांना विचारा, असेही देशपांडे यांनी सांगितले.
—-
लक्ष्मणराव इनामदार यांचे जीवन अलौकिक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन
