सामाजिक

लक्ष्मणराव इनामदार यांचे जीवन तपस्वी, अलौकिक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

मुंबई, दि. ६
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रांत प्रचारक लक्ष्मणराव इनामदार यांचे जीवन तपस्वी, अलौकिक होते, डॉ. केशव बळीराम हेडगेवारांचा परीसस्पर्श झाल्याने ते परीसच बनले, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले.

लक्ष्मणराव इनामदार यांचे जीवन अलौकिक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व राजाभाऊ नेने लिखित लक्ष्मणराव इनामदार यांच्या जीवनावरील ‘सेतुबंध’ या गुजराती ग्रंथाच्या मराठी अनुवादाच्या प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.

धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्राची स्थापना करण्यासाठी हिंदूंनी साधना करण्याचा निश्चय करावा- अभय वर्तक

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, बिमल केडिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आता मंदिर परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यासाठी लढा – महाराष्ट्र मंदिर महासंघाचा निर्णय

कर्तृत्व, वकिलीचे शिक्षण, गुणसंपदा आणि आध्यात्मिक तेज इनामदार यांनी संघ कार्यात ओतले. आपली जबाबदारी पार पाडत असताना साधना किंवा तपश्चर्या केल्याशिवाय भारत विश्वगुरू तसेच आपला समाज शांतीपूर्ण, वैभवसंपन्न आणि नीतीसंपन्न होऊ शकत नाही, असेही भागवत म्हणाले.

दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश आदींच्या हत्यांचा तपास केवळ राजकीय हेतूने- डॉ. अमित थडानी

देशाचे जीवन जगाला मार्गदर्शक ठरायचे असेल, तर हाच एकमेव मार्ग आहे. संघाची दृष्टी किंवा विचार ज्यांना स्पष्टपणे समजला, त्यांची दिशा किंवा निर्णय संघाच्या तत्त्वाशी फटकून असणारच नाही. आणीबाणीच्या काळात त्याचे प्रत्यंतर आले,असेही भागवत यांनी स्पष्ट केले
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *