राजकीय

राजीनामा परत घ्यायचाच होता तर दिला कशाला? -अजित पवार यांचा शरद पवार यांना बोचरा सवाल

मुंबई, दि. ५
गेल्या महिन्यात शरद पवार साहेबांनी राजीनामा दिला आणि तो परतही घेतला. राजीनामा परत घ्यायचाच होता तर दिला कशाला? असा बोचरा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केला.
राष्ट्रवादीतून बंड केल्यानंतर अजित पवार यांच्या गटाचा पहिला जाहीर मेळावा वांद्रे येथे झाला. यावेळी अजित पवार बोलत होते.

देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

एक वय असते. त्या वयात थांबावे लागते. मग तो शेतकरी असो, शासकीय अधिकारी असो किंवा उद्योपती, राजकारणी असो. पण वरिष्ठ नेते थांबालयाच तयार नाहीत. ते खूप हट्टी आहेत? पण हे नेमके कशासाठी? मी सुप्रियाला सांगितले, तू साहेबांशी बोल, समजावून सांग,पण नाही. त्यांना थांबायचेच नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती -प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

तरुण नेतृत्वाला आशीर्वाद द्यायला काय हरकत आहे? मी कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा दोष आहे का? चुकलं तर चुकले म्हणून सांगा, पण तसे ते करत नाही, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला.

अपात्र ठरू नये यासाठी अजित पवार यांना ३६ आमदारांचा पाठिंबा आवश्यक

शरद पवार यांच्या मुशीत मी घडलो, त्यांच्या छत्रछायेखाली माझी जडण घडण झाली. ते आपले श्रद्धास्थान आहेत. राज्यपातळीवर आणि देशपातळीवर जे राजकारण चालले आहे ते पाहता काही निर्णय गरजेचे आहे, असेही पवार म्हणाले.
तर छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. आपण कोणासोबतही गेलो तरी विचारधारा कायम राहिली पाहिजे.

आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच सरकारमध्ये सामील झालो- उपमुख्यमंत्री अजित पवार

धरसोड वृत्तीचे राजकारण करुन चालणार नाही. २०१९ च्या निवडणुकीआधी किंवा नंतर काय बोलणी झाली होती? अजित पवार उगाच सकाळी उठून शपथ घेण्यासाठी गेले का? आपण वारंवार दिल्लीत चर्चा करायची आणि काही दिवस झाले की त्यामधून माघार घ्यायची. अशा राजकारणामुळे आपण अनेक नेत्यांना तोंडघशी पाडतो, हेदेखील लक्षात कसे येत नाही, असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रात राजकीय भूकंप, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार शिवसेना भाजप सरकारमध्ये सहभागी

आतापर्यंत सगळ्यात जास्त अपमान अजित पवार यांचा झाला असून त्यांना सगळ्यात जास्त वेळा मान खाली घालावी लागली आहे. अजित पवारांवर आतापर्यंत मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र तरीही त्यांनी हा अपमान सहन केला. शरद पवारांसाठी त्यांनी सगळं सहन केले, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *