साथीच्या आजाराचे रुग्ण शोधण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाची धडक मोहीम
मुंबई, दि. ४
मुंबई शहर आणि उपनगरातील डेंग्यू, हिवताप आदी साथीच्या आजाराचे रुग्ण शोधण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनातर्फे धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. खासगी रुग्णालये, प्रयोगशाळा, दवाखाने, वैद्यकीय व्यावसायिक यांचे सहकार्य या मोहिमेसाठी घेण्यात येणार आहे.
बोगस डॉक्टर उपलब्ध करून देणा-या संस्थेचे कंत्राट रद्द, संस्थेचे नाव काळ्या यादीत
बृहन्मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४ प्रभागात आपत्कालीन विभागीय नियंत्रण कक्ष सुरू
डेंग्यू, मलेरियाची लक्षणे असणा-या रुग्णांचा मोहीम स्वरूपात शोध घेण्याचे व लक्षणे आढळून आल्यास वैद्यकीय चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या चाचणीमध्ये डेंऊ, मलेरियाचे निदान झालेल्या रुग्णांनी वेळेवर औषध घ्यावे व आवश्यक ती काळजी घ्यावी, यासाठी ‘टेलिफोनिक फॉलोअप’ घेता यावा, याकरिता सर्व २४ विभागांमध्ये कार्यरत असलेल्या नियंत्रण कक्षांमार्फत कार्यवाही करण्याचे निर्देशही डॉ. शिंदे यांनी दिले आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) दक्षा शहा यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राहुल कनाल यांचा शिवसेनेत प्रवेश
सर्व खासगी प्रयोगशाळा व रुग्णालये यांनी त्यांच्याकडील सर्व डेंग्यू व मलेरिया रुग्णांची माहिती महापालिकेला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. करोनाच्या धर्तीवर घरोघरी जाऊन शोधमोहीम घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नागरिकांनी आपल्या घरामध्ये, घराच्या आजूबाजूला व सोसायटीच्या परिसरात कुठेही साचलेले पाणी असणार नाही याची दक्षता घ्यावी.
साचलेल्या पाण्यातच डासांची मादी अंडी घालते व डासांची उत्पत्ती स्थळे तयार होतात ही बाब लक्षात घेऊन साचलेले पाणी आढळून आले असते तात्काळ नष्ट करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
—–
