ठळक बातम्या

कल्याण डोंबिवली महापालिकेचा दर सोमवार ‘जनता दरबार’

कल्याण, दि. ३
नागरिकांच्या तक्रारींचे प्रभाग स्तरावर निराकरण करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून दर सोमवारी जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे.

महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी जनता दरबार घेण्याचे आदेश दिले आहेत. दुपारी तीन ते पाच या कालावधीत हा जनता दरबार होणार आहे.

कल्याणमध्ये महापालिका मुख्यालयात परिमंडळ एक उपायुक्त धैर्यशील जाधव तर डोंबिवलीत महापालिका विभागीय कार्यालयात ( डोंबिवली पूर्व, रेल्वे स्थानकाजवळ) स्वाती देशपांडे यांच्या अधिपत्याखाली जनता दरबार होणार आहे.

जनता दरबारात नागरी समस्यांबरोबर कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबींचीही दखल घेण्यात येणार आहे. या जनता दरबाराला महापालिका सहाय्यक आयुक्त, तांत्रिक अधिकारी, कर्मचारी यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

विभागीय उपायुक्तांकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पंधरा दिवसात मार्गी लावण्याचे आदेश महापालिका आयुक्त दांगडे यांनी दिले आहेत.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *