राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर जिल्हाध्यक्ष पदावरून आनंद परांजपे यांची हकालपट्टी
ठाणे, दि. ३
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ देणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आले आहे.
परांजपे यांच्या जागी माजी नगरसेवक सुहास देसाई यांची तर कार्याध्यक्षपदी प्रकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर ही घोषणा केली आहे.
—-
