तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक
मुंबई, दि. १
देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी उद्या रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अपडाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे.
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ अशी मेगाब्लॉकची वेळ आहे.
हरबर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या वेळेत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
—-
