राजकीय

आमचे सरकार आल्यावर आम्ही आणि पोलीस तुमची जागा दाखवून देऊ- आदित्य ठाकरे

मुंबई, दि. १
तुमच्या फाइल्स बनविल्या आहेत. आमचे सरकार आल्यावर आम्ही आणि पोलीस येऊ आणि तुमची जागा तुम्हाला दाखवू,असा इशारा उबाठा गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी आज येथे दिला.

बृहन्मुंबई महापालिकेतील अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचाराच्या मुद्दावरून ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका मुख्यालयावर मोर्चाची सांगता झाली. त्यावेळी ठाकरे बोलत होते.

यापुढे फाइलवर सही करताना लक्षात ठेवा. दिल्लीचे कितीही आदेश आले, तरी मुंबईला लुटू नका,” असेही ठाकरे म्हणाले.

मला तुम्ही पप्पू म्हणता ना, हा पप्पू सर्व वार झेलायला तयार आहे, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *