ठळक बातम्या

बिर्ला महाविद्यालय आणि संलग्न संस्थांतर्फे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ‘ज्ञानदिंडी’

कल्याण, दि. २९
आषाढी एकदशी निमित्त येथील बी. के. बिर्ला महाविद्यालय आणि या समुहाशी संलग्न संस्थांतर्फे गुरुवारी सकाळी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ‘ज्ञानदिंडी’ काढण्यात आली.

नागरिकांना स्वच्छता आणि पर्यावरणाचे महत्व कळावे म्हणून ज्ञान दिंडीच्या माध्यमातून बिर्ला महाविद्यालय ते शहाड येथील विठ्ठल रुक्मिणीबाई मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली. कल्याण परिसरातील शैक्षणिक, सामाजिक संस्था उपक्रमात सहभागी झाले.

वारकऱ्याच्या पेहरावात विद्यार्थी, शिक्षक हातात विठ्ठल भक्तीची पताका घेऊन सहभागी झाले होते. विद्यार्थी, शिक्षक, कामगार, अधिकारी, पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.

महाविद्यालय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ओ. आर. चितलांगे, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, शिक्षण संचालक डाॅ. नरेशचंद्र, प्राचार्य डाॅ. अविनाश पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी पूजन करण्यात आले.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *