ठळक बातम्या

महापालिकेच्या १६ उपनगरीय रुग्णालयांतील कंत्राटी डॉक्टरांची पदवी तपासली जाणार

मुंबई, दि. २९
बृहन्मुंबई महापालिकेच्या १६ उपनगरीय रुग्णालयांतील अतिदक्षता विभाग, वैद्यकीय अतिदक्षता विभागांमध्ये बाह्यस्रोतांद्वारे पुरविण्यात येणाऱ्या कंत्राटी डॉक्टरांची पदवी आणि प्रमाणपत्रे तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचे प्रकरण उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा आरोग्य विभागाने हे आदेश दिले आहेत.

न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी चौकशी केल्यानंतर येथील काही डॉक्टरांची पदवी प्रमाणपत्रे बनावट असल्याचे समोर आले.
जीवन ज्योत ट्रस्टसह अन्य संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अतिदक्षता विभागातील सर्व डॉक्टरांची पदवी प्रमाणपत्रे तपासण्याचा निर्णय घेतला आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *