धर्म संस्कृती

भारतात आता ‘रेल जिहाद’ ? – आर.एस्.एन्. सिंह

फोंडा, दि. २१
गेल्या काही दिवसांत घडलेल्या रेल्वे दूर्घटना म्हणजे भारतातील ‘रेल जिहाद’ आहे, असे प्रतिपादन दिल्ली येथील संरक्षणतज्ञ कर्नल आर.एस्.एन्. सिंह यांनी केले. फोंडा गोवा येथे सुरू असलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात’ ते ‘रेल जिहाद’ या विषयावर बोलत होते.‌

काही दिवसांपूर्वी बालासोरमध्ये भीषण रेल्वे अपघात होऊन ३०० प्रवाशांचा मृत्यू झाला. बालासोरच्या आधी ३१ मार्चला दिल्लीतील शाहीन बाग येथील शाहरूख सैफी या जिहाद्याने केरळमध्ये जाऊन ‘अलप्पुळा-कन्नूर एक्सप्रेस’मध्ये घातक ज्वलनशील पदार्थ टाकून तीन प्रवाशांना जाळून ठार मारले. या घटनेत ९ जण गंभीर जखमी झाले. शाहरूख सैफी हा भारतात बंदी घातलेल्या झाकीर नाईकचा अनुयायी असल्याचे सिंह म्हणाले.

त्यानंतर १ जून रोजी याच रेल्वेगाडीत पुन्हा तशाच घटनेची पुनरावृत्ती झाली. केरळमधील कन्नूर स्थानकात बोगीला आग लावण्यात आली. ती बोगी भारत पेट्रोलियमच्या इंधन टाक्यांजवळ होती. याला म्हणतात ‘गजवा-ए-हिंद’, हाच ‘रेल जिहाद’ आहे, असे सिंह यांनी सांगितले.
भारतात ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू झाली, तेव्हापासून तिच्यावर देशभरात ठिकठिकाणी दगडफेक होत आहे.

हल्ल्याची पद्धतही एकसमान आहे. ‘वंदे भारत’विषयी इतका तिरस्कार का? ‘वंदे मातरम्’चा द्वेष करणारेच ‘वंदे भारत एक्स्प्रेस’वर हल्ले करत आहेत, हा ‘रेल जिहाद’ नव्हे का ? असा प्रश्न सिंह यांनी उपस्थित केला.

छत्तीसगड येथील रामबालकदासजी महात्यागी महाराज यांच्या हस्ते मराठी आणि हिंदी भाषेतील ‘हिंदु राष्ट्र : आक्षेप-खंडण’ या ‘ई-बुक’चे प्रकाशन करण्यात आले.

त्रिपुरात शाळांच्या माध्यमातून हिंदूंचे धर्मांतर – चित्तरंजन स्वामी १९८५/८६ पासून त्रिपुरामध्ये हिंदूंचे धर्मांतर मोठ्या प्रमाणात होत आहे. ख्रिस्त्यांनी मुलांसाठी इंग्रजी शिक्षण देणार्‍या शाळा काढल्या आहेत. या शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांना चांगल्या शिक्षणाचे आमिष दाखवून आणि बुद्धिभेद करून विद्यार्थी अन् पालक यांचे धर्मांतर केले जात आहे.

त्रिपुरात मठ-मंदिरांमध्ये अनेक साधू-संत आहेत; परंतु तेथे येणार्‍या हिंदूंना धर्माचे शिक्षण दिले जात नसल्याने धर्मांतराची समस्या फोफावली आहे, असे त्रिपुरा येथील ‘शांती काली आश्रमा’चे चित्तरंजन स्वामी महाराज यांनी ‘त्रिपुरा येथील धर्मांतराची समस्या, उपाय आणि यश’ या विषयावर बोलताना सांगितले.

छत्तीसगड येथील ‘श्री जामडी पाटेश्वरधाम सेवा संस्थान’चे संचालक रामबालकदासजी महात्यागी, नेपाळ येथील ‘ॐ रक्षा वाहिनी’चे प्रमुख चिरण वीर प्रताप खड्का यांनीही मनोगत व्यक्त केले.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *