धर्म संस्कृती

राज्य शासनातर्फे वारक-यांना विमा संरक्षण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई, दि. २१
पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना राज्य शासनातर्फे विमा संरक्षण देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.‌

ही विमा योजना विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र या नावाने असून यामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे.

वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असणार आहे.‌ एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असून दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येणार आहेत. तर अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळणार आहे.

याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *