Thursday, August 20, 2026
Latest:
सामाजिक

राज्यातील अंगणवाडी सेविकांचे बुधवारी थाळीनाद आंदोलन

मुंबई, दि. १३
विविध २१ मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका १५ जून रोजी थाळीनाद आंदोलन करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकडून देण्यात आली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अंगणवाडी सेविकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सराकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा मानधनाच्या अर्धी रक्कम निवृत्तीवेतन म्हणून देण्याचे तत्त्वत: मान्य केले होते. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना दिल्या होत्या.

मात्र यावर कार्यवाही झालेली नाही. सरकारला तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे अंगणवाडी कर्मचारी संघाचे म्हणणे आहे.

अंगणवाडी सेविकांसाठी निवृत्तीवेतन योजना लागू करा, सेवानिवृत्ती लाभ, ग्रॅच्युईटी, नवीन भ्रमणध्वनी, अंगणवाडी केंद्रांना भाडेवाढ, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *