Thursday, August 20, 2026
Latest:
साहित्य

के. ज. पुरोहित यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने उद्या चर्चासत्र, व्याख्यान कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई, दि. १४
ज्येष्ठ साहित्यिक, कथाकार के. ज. पुरोहित उर्फ शांताराम यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त उद्या (गुरुवारी) चर्चा आणि व्याख्यान होणार आहे.‌ ‘ग्रंथाली’ आणि वांद्रे येथील नॅशनल लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत होणा-या पहिल्या सत्रात ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कथा’ या विषयावरील सत्रात भारत सासणे, मीना गोखले, डॉ. रवींद्र शोभणे, चांगदेव काळे सहभागी होणार आहेत.

दुपारी २ ते ४ या दुसऱ्या सत्रात ‘नव्या वळणाच्या मराठी कथा’ या परिसंवादात निरजा, गणेश मतकरी, ऋषिकेश गुप्ते, किरण गेले, मोनिका गजेंद्रगडकर हे वक्ते सहभागी होणार आहेत.
संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या अखेरच्या सत्रात के. ज. पुरोहित यांच्या ‘ मित्रास्त’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी न्या. नरेंद्र चपळगावकर डॉ.अभय बंग, डॉ .रवींद्र शोभणे, डॉ. सुरेखा सबनीस, डॉ. श्रीरंग पुरोहित, सुरेश हिंगलासपूरकर, प्रमोद महाडिक हे उपस्थित राहणार आहेत.

हे सर्व कार्यक्रम ग्रंथाली- ‘प्रतिभांगण, केन रस्ता, सरकार हेरिटेजसमोर, वांद्रे (पश्चिम) ‘ येथे होणार होतील.
नॅशनल लायब्ररी, दुसरा मजला, स्वामी विवेकानंद रस्ता, वांद्रे रेल्वे स्थानकासमोर, पश्चिम येथे होणाऱ्या अन्य एका कार्यक्रमात ‘शब्द रुची’ मासिकाच्या के ज. पुरोहित विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी ‘कथाकार शांताराम’ हा माहितीपट दाखविण्यात येणार असून त्यानंतर अभिनेत्री मधुरा वेलणकर आणि ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे शांताराम यांच्या कथेचे अभिवाचन करणार आहेत.
सर्व कार्यक्रमांसाठी प्रवेश खुला आहे.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *