वाहतूक दळणवळण

अनावश्यक कारणासाठी मध्य रेल्वेवर नऊशेहून अधिक वेळा आपत्कालीन साखळी ओढण्याचे प्रकार

प्रवाशांकडून २ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल

मुंबई, दि. १२

अनावश्यक कारणासाठी मध्य रेल्वेवर हे महिन्यात नऊशेहून अधिक वेळा आपत्कालीन साखळी ओढण्याचे प्रकार घडले असल्याचे समोर आले आहे.‌ या प्रकरणी ७०० प्रवाशांच्या विरोधात कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आपल्याला हव्या त्या स्थानकात उतरण्यासाठी आपत्कालीन साखळी खेचण्याचे प्रकार होत असल्याचे मध्य रेल्वेच्या निदर्शनास आले आहे. हे प्रकार विशेषतः लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये घडले आहेत.

भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार अनावश्यक कारणांसाठी आपत्कालीन साखळी खेचणे दंडनीय गुन्हा आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *