अधिक संख्येत महिला काम करतात त्याठिकाणी ‘हिरकणी कक्ष’ बंधनकारक
मुंबई, दि. १२
महिला अधिक संख्येने जेथे काम करतात काम त्याठिकाणी ‘हिरकणी कक्ष’ बंधनकारक करण्यात आला आहे. त्यासाठी महापालिका अधिनियमात कायदेशीर तरतूद करणारी अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे.
राज्यात यापुढे बांधण्यात येणाऱ्या निवासी आणि वाणिज्य इमारतींमध्ये ‘हिरकणी कक्ष’ तयार करण्यात येणार असून, त्या जागेचा चटईक्षेत्र निर्देशांक(एफएसआय) मोजण्यात येणार नाही.
प्रत्येक पोलीस ठाण्यात हिरकणी कक्ष स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती.
आता मुंबईत रेल्वे, बस स्थानके, रुग्णालये या ठिकाणी नवजात शिशू/बालके आणि माता यांच्या सोयीसाठी अद्ययावत ‘हिरकणी कक्ष’ सुरु करण्याची मोहीम होती घेण्यात आली आहे.
पहिल्या टप्यात १७ ठिकाणी ‘हिरकणी कक्ष’ स्थापन केले जाणार आहेत. तसेच सार्वजनिक, निमसार्वजनिक, संस्थात्मक, शैक्षणिक आदी इमारतींमध्ये ‘हिरकणी कक्ष’ स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हिरकणी कक्षामुळे स्तनदा माता, गरोदर महिला, सहा वर्षांखालील मुले व त्यांच्या मातांची सोय होणार आहे.
—–