काळबादेवी येथील पाच मजली इमारतीला आग; एक जखमी
मुंबई, दि. ९
काळबादेवी येथील एका पाच मजली इमारतीला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागली. मुंबादेवी मंदिराजवळ ही दुर्घटना घडली. सकाळी सव्वाआठच्या सुमारास आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.
इमारतीच्या पाचव्या मजल्यापर्यंत आग पसरली होती. इमारतीत सुमारे ५० ते ६० रहिवासी अडकले होते. दुर्घटनेत एक जण जखमी झाला.
———-
