रेपो दरात बदल न करण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय – कर्जदारांना मोठा दिलासा
मुंबई, दि. ९
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत कर्जदारांच्या कर्जदाचा हप्ता वाढणार नसल्याने कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या चालविषयक समितीच्या बैठकीत आरबीआयने सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कोणताही बदल केला नाही. यापूर्वी एप्रिल महिन्यातही व्याजदरात वाढ झाली नव्हती. रेपो दरात शेवटची वाढ फेब्रुवारीमध्ये झाली होती.
रिझर्व्ह बँकेकडून बँकांना ज्या दराने कर्ज दिले जाते त्याला रेपो दर म्हणतात. रेपो रेट वाढल्याने बँकांना आरबीआयकडून महागड्या दराने कर्ज मिळते. यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज इत्यादींचे व्याजदर वाढतात, ज्याचा थेट परिणाम इएमआयवर होतो.
——–
