ठळक बातम्या

चक्रीवाळ अधिक तीव्र होणार; मुंबई, पालघर, रायगड किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

मुंबई, दि. ९
बिपरजॉय चक्रीवाळ येत्या तीन दिवसांत अधिक तीव्र होणार असून मुंबई, पालघर, कोकण किनारपट्टी भागात या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये मोठ्या लाटा उसळतील. मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह लाटा उसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सध्या हे चक्रीवादळ कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागातून पुढे सरकत आहे. यामुळे किनारपट्टी भागाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *