शासकीय, खाजगी औद्योगिक प्रशिक्षण शिक्षण संस्थेतील अभ्यासक्रम प्रवेशाला १२ जूनपासून सुरुवात
मुंबई, दि. ८
राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) अभ्यासक्रम प्रवेशाला येत्या १२ जूनपासून सुरुवात होणार आहे.
व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना ११ जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहे. शासकीय आणि खासगी आयटीआय मिळून यंदा १ लाख ५४ हजार ३९२ जागा उपलब्ध आहेत.
दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमांना प्रवेश येऊ शकतात.
राज्यात ४१८ शासकीय आयटीआय असून यामध्ये ९५ हजार ३८० जागा आहेत तर ५७४ खाजगी आयटीआय असून यामध्ये ५९ हजार जागा आहेत. शासकीय आणि खासगी आयटीआय मध्ये विविध विषयांचे ८३ अभ्यासक्रम आहेत.
अधिक माहिती https://admission.devt.gov.in या संकेतस्थळावर मिळू शकेल.
——
