शैक्षणिक

इयत्ता दहावीची पुरवणीची परीक्षा १८ जुलैपासून सुरू

मुंबई, दि. ८
इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा येत्या १८ जुलैपासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहे.

१८ जुलैपासून सुरू होणारी दहावीची पुरवणी परीक्षा १ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. इयत्ता बारावीची सर्वसाधारण द्विलक्षी विषयांची परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान तर इयत्ता बारावीची व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा १८ जुलै ते ५ ऑगस्ट कालावधीत होणार आहे. या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरून घेण्यास सुरुवात झाली आहे.

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *