आगरी कोळी वारकरी भवनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन
ठाणे, दि. ८
वारकऱ्यांसाठी दिव्यातील बेतवडे येथे उभारण्यात येणाऱ्या आगरी कोळी वारकरी भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झाले. ठाणे महापालिकेतर्फे हे आगरी कोळी भवन उभारण्यात येणार आहे.
आत्ता १५ कोटी रुपये निधी देण्यात आला असून भवनच्या कामासाठी अतिरिक्त १५ कोटी रुपये देण्याची घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, वारकरी संप्रदायाचे जितेंद्र महाराज यांच्यासह वारकरी संप्रदायातील मंडळी, बेतवडे गावाचे नागरिक यावेळी उपस्थित होते.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे महाराष्ट्रासाठीचे योगदान सह्याद्री पर्वताएवढे- राज्यपाल रमेश बैस
संत सावळाराम महाराज स्मारकासाठीही जागा आणि निधी देण्यात येईल. तसेच आगरी कोळी वारकरी भवनला सावळाराम महाराजांचे नाव देण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करू असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
ठाणे, दिवा, कल्याण परिसरात आगरी, कोळी व वारकरी मोठ्या संख्येत राहतात. त्यांच्यासाठी हे भवन उभारण्यात येत असून येत्या वर्षभरात ते उभे राहिल. या वास्तूत आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन घडेल, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
—-
.
