ठळक बातम्या

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या डोंबिवली शाखेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

डोंबिवली दि.२९ :- स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या डोंबिवली शाखेतर्फे सावरकर प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ.शुभदा जोशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार’ या विषयावर भाषण केले.

देश अन् धर्म वाचविण्याविषयी हिंदू बोलत असतील तर ते ‘हेट स्पीच’ आहे का ? अधिवक्ता सुभाष झा

निसर्ग आणि पक्षीअभ्यास या विषयात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अर्णव पटवर्धन आणि ‘ओळख भुशास्त्राची’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकानिमित निनाद भागवत यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी महासंघातर्फे एक लाख सह्यांची मोहीम राबविण्याची घोषणा महासंघचे राष्ट्रीय सचिव अमरेंद्र पटवर्धन यांनी केली.

आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येक विभागांच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याची सुरुवात या कार्यक्रमातच करण्यात आली. संपूर्ण वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास मुंबई प्रदेश संघटन मंत्री आनंद पद्मनाभन, मुंबई प्रदेश सरचिटणीस शशांक खेर, पुरोहित आघाडीतील गुरुजी आणि सदस्य, विश्व हिंदू परिषदेचे सतीश महानुर, चित्तपावन संघाचे माधव घुले तसेच वरिष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *