ठळक बातम्या

किती मेट्रीक गाळ काढला यापेक्षा मुंबईत कुठेही पाणी तुंबणार नाही याची काळजी घ्या- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईतील नालेसफाईची मुख्यमंत्र्यांकडून प्रत्यक्ष पाहणी

मुंबई दि.१८ :- मुंबईतील सुमारे २२०० कीलोमीटर लांबीच्या नाल्यांची सफाई व्यवस्थित आणि खोलपर्यंत केल्यास यंदा पावसाळ्यात पाणी साचण्यापासून मुंबईकरांना होणारा त्रास वाचेल. त्यामुळे किती मेट्रीक गाळ काढला यापेक्षा मुंबईत पाणी कुठे तुंबणार नाही याची काळजी घेण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाईच्या कामांचा प्रत्यक्ष जागेवर जाऊन आढावा मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. दुपारी तीन वाजता सुरू झालेला हा पाहणी दौरा सायंकाळी सहाच्या सुमारास वरळी येथे संपला.

२०२८ लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील : राजदूत एरिक गारसेटी

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तो यावर्षी करावा लागू नये करिता नाले सफाई चांगली झाली पाहिजे, नाल्यांचे खोलीकरण मोठ्या प्रमाणावर करा, असे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. जे अधिकारी चांगले काम करतील त्यांचा सन्मान केला जाईल कर्तव्यात जे कसूर करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

गृहनिर्माण प्रकल्पांमधील ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी नोंदणी प्रक्रिया अधिक कडक – महारेराचा निर्णय

नाल्यांचे खोलीकरण झाल्यानंतर त्यांची वहन क्षमता वाढेल. त्याच बरोबर ज्या ठिकाणी दरवर्षी पाणी साचते त्यांची माहिती अधिकाऱ्यांना असते त्यामुळे अशा जागी नोडल अधिकारी नेमून कंत्राटदाराकडून चांगल्या पद्धतीने काम करुन घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. रेल्वे हद्दीतील नाल्यांची देखील चांगल्या पद्धतीने सफाई झाली पाहिजे जेणे करून रेल्वेरुळांवर पाणी साचणार नाही. याची देखील दक्षता घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनास सांगितले.

औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दुपारी तीनच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे यांचे वांद्रे (पूर्व) परिसरातील मिठी नदी येथे आगमन झाली. तेथून त्यांच्या पाहणी दौऱ्यास सुरूवात झाली. त्यानंतर वांद्रे कुर्ला संकुलातील भारत नगर येथे वाकोला नदीची पाहणी केली. त्या पाठोपाठ दादर मधील प्रमोद महाजन उद्यानातील साठवण टाकीचे बांधकाम, वरळीतील लव्हग्रोव उदंचन केंद्र या ठिकाणी भेट देवून नालेसफाई तसेच पावसाळ्यात पाणी साचणार यासाठीच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सदा सरवणकर, महापालिका आयुक्त आय. ए. चहल, अतिरीक्त आयुक्त पी. वेलारासु, आशीष शर्मा, महापालिका उपायुक्त, मुख्य अभियंता आदी अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *