मेट्रो ३ मार्गिकेचे संचालन आणि देखभाल दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन करणार?
मुंबई दि.१४ :- कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेचे संचालन आणि देखभाल दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (डीएमआरसी) केले जाण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) निविदा नुकत्याच उघडण्यात आल्या. डीएमआरसी आणि फ्रान्सच्या केओलिस कंपनीकडून निविदा सादर करण्यात आल्या आहेत.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरचे प्रवेशद्वार रात्री ११ ते सकाळी ७ यावेळेत बंद राहणार
यात ‘डीएमआरसीची’ बोली सर्वात कमी असल्याने हे कंत्राट ‘डीएमआरसी’ला मिळण्याची शक्यता आहे.’एमएमआरसी’कडून ३३.५ किमीच्या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असून ही मार्गिका आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांमुळे हा प्रकल्प अजूनही पूर्ण होऊ शकला नाही.
योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ चरित्रग्रंथाचे येत्या १८ एप्रिलला प्रकाशन
डिसेंबर २०२३ पर्यंत सीप्झ ते बीकेसी हा पहिला टप्पा सुरु करण्याचा निर्णय ‘एमएमआरसीए’ने घेतला आहे. दुसरा टप्पा जून २०२४ मध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे. त्याचाच भाग म्हणून आता मेट्रो ३ चे संचालन आणि देखभालीसाठी कंपनी नियुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
