जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बस अपघात; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.१५ :- जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे भीषण अपघात झाला. मुख्यमंत्री एकनाथ यांनी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
मेट्रो ३ मार्गिकेचे संचालन आणि देखभाल दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन करणार?
अपघाताचे वृत्त समजताच मुख्यमंत्री शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
