महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत- नाना पटोले
मुंबई दि.१२ :- महाविकास आघाडी भक्कम असून आघाडीत कोणतेही मतभेद नसून महाविकास आघाडीच्या राज्यभर वज्रमुठ सभा होत आहेत. महाविकास आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक धास्तावले असल्याने विरोधकांकडून आघाडीत मतभेद असल्याचा अपप्रचार केला जात आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. महाविकास आघाडीतील नेते एकमेकांना भेटत असतात, असे स्पष्ट करून पटोले म्हणाले, येत्या १६ एप्रिला नागपूर येथे वज्रमुठ सभा होणार आहे. त्यानंतर अमरावती, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि मुंबई येथेही सभाही होणार आहेत.
