एस्.टी. महामंडळाच्या १६ मुख्य बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे व्यवस्थापकीय संचालकांना सादर
मुंबई दि.१२ :- राज्यातील मुख्य बसस्थानके अत्यंत अस्वच्छ असून अशा अस्वच्छ १६ बसस्थानकांच्या दुरवस्थेची माहिती छायाचित्रांसह एस्.टी. महामंडळाला देण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’अंतर्गत एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेऊन ही छायाचित्रे आणि त्याविषयीची माहिती त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनंतर महाराष्ट्र शासनाने सर्व एस्.टी. बसस्थानकांवर स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. मोहीमेची घोषणा करून चार महिने झाले आहेत; प्रत्यक्षात मात्र बसस्थानके अस्वच्छ आहेत. मुख्य बसस्थानकांची अशी दुरवस्था झाली असेल, तर राज्यात खरोखर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे का? ही मोहीम फक्त कागदावरच आहे का? असे प्रश्न उपस्थित करत या मोहिमेचा आढावा घेऊन बसस्थानक स्वच्छता मोहीम प्रामाणिकपणे राबविण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीअंतर्गत ‘सुराज्य अभियाना’कडून करण्यात आली.
प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक समन्वय समितीची स्थापना
सोलापूर, देगवड, सावंतवाडी, भुसावळ, जळगाव, दापोली, राजापूर, खेड, रत्नागिरी, सातारा, स्वारगेट, कराड, अमरावती, अकोला, आर्णी आणि वणी बसस्थानकांच्या दुरावस्थेची माहिती आणि छायाचित्रे प्रशासनाकडे देण्यात आली. यात प्रसाधनगृहाची दुरवस्था, बसस्थानकांच्या परिसरात कचर्याचे साम्राज्य, भित्तीपत्रकांमुळे विद्रूप झालेल्या भिंती, तुटलेली व अस्वच्छ बाकडी, बंद असलेले पिण्याच्या पाण्याचे नळ, जळमटांनी माखलेले छत, परिसरातील खड्डे, बंद उपहारगृहे याचा समावेश आहे.
