उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा- किरीट सोमय्या
मुंबई दि.१० :- करोना कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे.
ठाकरे यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपाचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुणे येथील शिवाजीनगर पोलिसांकडे केली.
पाणी देयक वसुली मोहिमेत वर्षभरात ८ हजार ५७१ थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडीत
पुण्यात उभारण्यात आलेल्या करोना केंद्राचे काम अस्तित्वात नसलेल्या लाइफलाईन कंपनीला उद्धव ठाकरे आणि संबंधित अधिकाऱ्यांंनी दिले. त्याच दरम्यान या केंद्रात उपचार घेणाऱ्या रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि लाइफलाईन कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सोमय्या यांनी केली.
मोर्बी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ६.५० कोटी रुपयांच्या मालमत्तांचा २० एप्रिलला लिलाव
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर यांच्या लाइफलाईन कंपनीला करोना कालावधीत शिवाजीनगर येथे करोना केंद्र उभारण्याचे काम देण्यात आले होते. त्यावेळी ती कंपनी अस्तित्वातही नव्हती. सर्व नियम डावलून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे काम दिले होते, असेही सोमय्या यांनी सांगितले.
